जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

 















v ऑनलाईन पास संकेतस्थळाचे उद्घाटन
यवतमाळ, दि.1 :  महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. कोव्हिड - 19 च्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या सुचना होत्या. त्यानुसार हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त पोलिस अधिक्षक नुरुल हसन, अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे उपस्थित होते.
      अत्यावश्यक सेवेसाठी आता तालुकास्तरावर ऑनलाईन पास : अत्यावश्यक कारणासाठी आपल्या जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात जाणे - येणे करण्यासाठी जिल्हा मुख्यालयी येऊन पास घेण्याची आवश्यकता नाही. ही सुविधा ऑनलाईन पध्दतीने आता तालुकास्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या ऑनलाईन पास संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
     epassyavatmal.co.in या संकेतस्थळावर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील नागरिक अत्यावश्यक कारणासाठी पास मिळवू शकतात. यासाठी 16 तालुक्यातील तहसीलदारांना पास देण्याचे अधिकृत अधिकार देण्यात आले आहे. तसेच कोणत्या तालुक्यातून किती पासेसचे वाटप झाले, हे जिल्हास्तरीय डॅशबोर्डवर दिसणार आहे. या ऑनलाईन पासेचे डिजीटल व्हेरीफिकेशनसुध्दा होणार आहे.
     जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त पोलिस अधिक्षक नुरुल हसन, अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे उपस्थित होते.  
0000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी