पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह : आयसोलेशन वॉर्डातून 4 जणांना सुट्टी

         
         
v ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 81
यवतमाळ, दि.9 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट आलेल्या 4 जणांचा दुसरा आणि तिसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्यांना आरोग्य पथकाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 81 असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले.
गत 24 तासात शासकीय महाविद्यालयाला एकूण 155 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 151 रिपोर्ट निगेटिव्ह तर एकाचा रिपोर्ट नव्याने पॉझेटिव्ह आल्याने शुक्रवारच्या पॉझेटिव्ह संख्येत एकाची भर पडली. त्यामुळे एकूण संख्या 85 वर गेली. मात्र आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट आलेल्या चार जणांचा दुसरा आणि तिसरा रिपोर्ट 14 दिवसांच्या कालावधीनंतर निगेटिव्ह आला. त्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 81 झाली आहे. सद्यस्थितीत 8 आणि 9 मे रोजीचे 45 आणि शनिवारी पाठविलेले 64असे एकूण 109 रिपोर्ट अप्राप्त आहे.  आयसोलेशन वॉर्डात 105 जण भरती असून यातील 20 प्रिझमटिव्ह केसेस आहेत.
आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरीता एकूण 1490 नमुने पाठविले आहे. यापैकी 1381 प्राप्त तर 109 अप्राप्त आहेत. तसेच सुरवातीपासून आजपर्यंत 1286 नमुने निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 83 तर गृह विलगीकरणात एकूण 1186 जण आहेत.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी