जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या सातवर


v 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' आणखी 38 लोकांना सुट्टी

यवतमाळ, दि.16 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट्स आलेले 38 लोक, 14 दिवसांच्या उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना आयसोलेशन वॉर्डमधून सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या 38 पैकी 3 जणांना संस्थात्मक विलागिकरण कक्षात तर उर्वरित 35 जण आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलागिकरणात राहणार आहेत.

जिल्ह्यात आता एक्टिव पॉझिटिव्हची संख्या 45 वरून 7 वर आली आहे. विशेष म्हणजे 24, 25 आणि 26 एप्रिल या दरम्यान सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली. त्यामुळे संपूर्ण प्रशासन आणि यवतमाळकर चिंताग्रस्त झाले. त्यानंतर रुग्ण वाढीचा वेग कमी झाला असला तरी एक-दोन, एक-दोन पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरू होते. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा पाहता पाहता 98 वर गेला होता. मात्र प्रशासनाच्या उपाययोजना आणि संपूर्ण आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमामुळे 98 पैकी तब्बल 91 जणांना बरे करण्यात आरोग्य विभागाला लक्षणीय यश आले आहे. यवतमाळ जिल्ह्यसाठी ही अतिशय दिलासादायक बाब असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 13 जण भरती आहे. यापैकी सात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह तर सहा प्रिझमटिव्ह केसेस आहेत. सुरवातीला केवळ यवतमाळ शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते, मात्र नंतर नेर आणि उमरखेड़ (मौजा धानोरा) येथे पॉझेटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली. उमरखेड़ येथील पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व हाय रिस्क व लो रिस्क अशा 68 लोकांचे नमूने तपासणीसाठी पाठविले. हे सर्व रिपोर्ट्स नेगेटिव्ह आले आहेत. तसेच नेर येथील हाय रिस्क व लो रिस्क अशा 76 जणांचे रिपोर्ट्स तपासणीसाठी पाठवले असता यापैकी 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 73 रिपोर्ट्स नेगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. तसेच संस्थात्मक विलगीकरणात 11 तर गृह विलगीकरणात 798 जण आहेत.

 

     जिल्हा लवकरच कोरोनामुक्त : पालकमंत्री संजय राठोड

 यवतमाळ जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा जवळपास 100 पर्यंत पोहचला होता. मात्र जिल्हा प्रशासनाच्या अनेक उपाययोजना व नागरिकांच्या संयमामुळे तसेच सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे आज पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या सात वर आली आहे. यवतमाळ जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा आशावाद जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात रुग्णांची संख्या जवळपास 100 पर्यंत जाऊनही कोरोनामुळे एकही मृत्यु झाला नाही, ही जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाची मोठी कामगिरी आहे. तरीसुध्दा जनतेने घरीच रहावे, सुरक्षित राहावे. कुठेही गर्दी करू नये. तसेच शासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे - जिल्हाधिकारी एम.डी. सिंह

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 98 वरून सात वर आली आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने नक्कीच आनंदाची बाब आहे. गत दोन महिन्यांपासून सर्वांनी अतिशय मेहनत घेतली आहे. यात नागरिकांचेसुध्दा सहकार्य मिळाले आहे. मात्र अजूनही लढाई संपली नाही. कोरोनावर सध्यातरी लस उपलब्ध नाही. त्यामुळे ही लढाई जिंकण्यासाठी नागरिकांनी शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. विनाकारण गर्दी करू नये, मास्क लावूनच बाहेर पडावे. हात वारंवार स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी बाबी दैनंदिन जीवनात उपयोगात आणाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे. तसेच सर्व लोकप्रतिनिधी, नागरिक, प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सर्वांचे त्यांनी धन्यवाद मानले आहे.  

 

 

0000000000

Comments

  1. अभिनंदन सर्व कोरोना योद्ध्यांचे

    ReplyDelete
  2. अभिनंदन सर्व कोरोना योध्यांचे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी