आणखी दोन पॉझेटिव्ह रुग्णांची भर, एकूण संख्या 84 वर



v 24 तासात 39 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
यवतमाळ, दि.8 : कोरोनाबाधित रुग्णवाढीचा वेग मंदावला असला तरी अधूनमधून एक-दोन पॉझेटिव्ह रुग्ण आढळत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या आता 84 वर पोहचली आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेले हे रुग्ण नेर येथील पॉझेटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 139 जण भरती आहेत. यापैकी 55  प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
गत 24  तासात वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 41 रिपोर्ट प्राप्त झाले. यात दोन पॉझेटिव्ह तर 39 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. शुक्रवारी तपासणीकरीता 57 नमुने पाठविण्यात आले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 1426 नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. यापैकी वैद्यकीय महाविद्यालयाला 1266 प्राप्त तर 160 अप्राप्त आहेत. प्राप्त नमुन्यापैकी 1172 नमुने निगेटिव्ह आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 109 तर गृह विलगीकरणात 1121  जण आहेत.
००००००००
वृत्त क्र. 380
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ‘मनोधैर्य’ हैल्पलाईन कार्यान्वित
यवतमाळ, दि. 8 : कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण सतत वाढत असल्यामुळे सरकारने तातडीने संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. परिणामी सक्तीचे ‘सेल्फ क्वारंटाईन’ सर्वांच्या वाटेला आले आहे. त्यामुळे तासनतास काम करण्याची सवय असणाऱ्यांना घरात ठिय्या मांडून बसण्याची वेळ आली आहे. याचे वेगवेगळे दुष्परिणाम अलीकडच्या काळात दिसून येत आहे. बऱ्याच व्यक्तीमध्ये अस्वस्थता, चिंता, नैराश्य, भीती किंवा कोरोना फोबिया निर्माण होण्याची शक्यता आहे. यातील अनेकांना समुपदेशनाने खूप मोठा लाभ होवू शकतो. या पार्श्वभूमीवर मानसिक स्वास्थ समुपदेशन केंद्राचा लाभ सर्वांना मिळावा, या उद्देशाने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ‘कोविड -19 मनोधैर्य’ ही हेल्पलाईन सुरू केली असून त्याचा संपर्क क्रमांक 7588681688  आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.आर.पी.सिंग,  बालरोगशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख तथा कोविड – 19 चे समन्वयक डॉ.मिलिंद कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.के.राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मनोविकृतीशास्त्र विभागाने या हेल्पलाईनची सुरुवात केली आहे. ज्या सर्वसामान्य व संसर्ग झालेल्या नागरीकांना मानसिक आधाराची गरज आहे किंवा ज्यांच्या मनात भीती, चिंता, उदासिनता, बैचेनी, निद्रानाश, घबराहट या सारखे लक्षणे असतील त्यांनी या हेल्पलाईनची मदत घ्यावी, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी कळविले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी