मृत पॉझेटिव्ह रुग्णाबरोबर आलेले चार जण विलगीकरण कक्षात दाखल

v रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच झाला मृत्यु

यवतमाळ, दि. 30 : मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील मात्र मुंबई येथे पॉझेटिव्ह आढळलेल्या व्यक्तिला रुग्णवाहिकेने येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणतांना त्यांचा मृत्यु झाला. त्यामुळे त्यांच्यावर येथे उपचार करणेही शक्य झाले नाही. रुग्णवाहिकेत या मृतकासोबत आलेल्या चार जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले असून त्यांचे नमुने तपासणीकरीता लगेच पाठविण्यात येणार आहे.

दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील राजेश कालू राठोड (वय 43) हे मुंबई घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पीटलमध्ये गत चार दिवसांपासून भरती होते. मात्र तेथून MH 06 J- 8828  या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत राजेश राठोड, त्यांचा भाऊ आणि तीन चालक यवतमाळकडे निघाले. शनिवारी सायंकाळी सदर रुग्णवाहिका राजेश राठोड यांना घेऊन येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहचली. मात्र प्रवासादरम्यान रुग्णवाहिकेमध्येच राजेश राठोड यांचा मृत्यु झाल्याचे निदर्शनास आले. वैद्यकीय महाविद्यालयाने मृतकाचे सर्व रिपोर्ट मुंबईवरून मागविले असून त्यांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आहेत.

त्यामुळे सोबत आलेले तीन चालक आणि मृतकाचा भाऊ अशा चारही जणांना संस्थात्मक विलगीकरणात दाखल करण्यात आले असून त्यांचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपासणीकरीता हे नमुने त्वरीत पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या प्रशासनाने कळविले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी