जिल्ह्यात पुन्हा एक पॉझेटिव्ह, एकूण संख्या 82 वर

       
    
यवतमाळ, दि.6 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉडमध्ये
भरती असलेल्या एका जणाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या आता 82 वर पोहचली आहे. सदर रुग्ण हा नेर न.प. परिसरातील असून त्याचे वय 50 वर्षे आहे. आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 133 जण भरती आहेत. यात प्रिझमटिव्ह केसेसची संख्या 51 असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.
            गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 24 रिपोर्ट प्राप्त झाले. यात एकाचा रिपोर्ट नव्याने पॉझेटिव्ह आला असून चार जणाचे अहवाल 14 दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा पॉझेटिव्ह आले आहे. त्यामुळे ॲक्टीव पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 82 आहे. प्राप्त रिपोर्टपैकी 17 रिपोर्ट निगेटिव्ह तर दोन जणांचे अहवाल खारीज करून पुन्हा पाठविण्यात येईल. सुरवातीपासून आतापर्यंत तपासणीकरीता 1224 नमुने वैद्यकीय महाविद्यालयाने पाठविले आहे. यापैकी सर्व रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. प्राप्त नमुन्यांपैकी आतापर्यंत 1132 नमुने निगेटिव्ह आहे. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात 109 तर गृह विलगीकरणात एकूण 1119  जण आहेत.
            जिल्ह्यात मद्यविक्रीला पुन्हा बंदी : शासनाच्या निर्देशाप्रमाणे अटी व शर्तीला अधीन राहून यवतमाळ शहर वगळता उर्वरीत जिल्ह्यात मद्यविक्रीला ठराविक वेळेत परवानगी देण्यात आली होती. मात्र मद्य खरेदीकरीता नागरिकांनी गर्दी केल्यामुळे तसेच जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे पुन्हा मद्यविक्रीला बंदी घालण्यात येत आहे. तसे आदेश प्रशासनाने निर्गमित केले आहे.
शासन आणि प्रशासन आपल्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहे. मात्र नागरिकांच्या सहकार्याशिवाय आपण ही लढाई जिंकू शकत नाही. या संकटाच्या वेळी प्रशासनाच्या आदेशांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. तसेच गर्दी करू नये. बाहेर निघतांना मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
००००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी