सकाळी 8 ते 2 या वेळात बाजारातील दुकाने आळीपाळीने सुरु


यवतमाळ, दि.11 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये टाळेबंदीच्या दरम्यान प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यापूर्वी अत्यावश्यक व जीवनाश्यक वस्तूची दुकाने व बँकेचे व्यवहार (फक्त ग्राहकांसाठी ) सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र आता इतरही दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 यावेळेत आळीपाळीने ठरविलेल्या दिवशी सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारीत केले आहेत.
जिल्ह्यात ऑटोमोबाईल्स, वर्कशॉप/वाहन सर्व्हिसिंग सेंटर, हार्डवेअर, सिमेंट, टायर्स, बॅटरीज व वाहनाशी निगडीत ऑईलची दुकाने, सॉ मिल, ईलेक्ट्रीकल्स व ईलेक्ट्रॉनिक्सची दुकाने सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास आदेशित करण्यात आले होते. या आदेशामध्ये अंशत: बदल करून वेळेचा कालावधी आता सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात येत आहे. उर्वरित आदेश कायम राहून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून ती नियमित सुरु राहतील. जिल्ह्यातील झेरॉक्स सेंटर व वाहन पंक्चर दुरुस्तीची दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपावेतो नियमित सुरु राहतील. जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या इतर वस्तूंची सेवा सुरु करण्याबाबत खालील प्रकारचे दुकाने नेमून दिलेल्या दिवशी व वेळेत सुरु ठेवण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे.
रविवार, सोमवार, मंगळवार रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कापड, अंडरगारमेंटस, बुटीक ॲन्ड मॅचिंग सेंटर, टेलरिंग, फुटवेअर, लॉन्ड्री, कुशन व कर्टन्स, घड्याळ विक्री व दुरुस्ती, बुक स्टॉल, जनरल्स ॲन्ड स्टेशनरी स्टोर्स, पेपर मार्ट, भांडे विक्री इत्यादी तत्सम दुकाने सुरू राहतील. बुधवार आणि गुरवार रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत बॅनर पेंटीग ॲन्ड रेडीयम वर्क, ऑफसेट ॲन्ड प्रिटींग्स, फोटो स्टुडीओ, इंजिनिअरींग व वेल्डींग वर्क्स, मार्बल, ग्रेनाईड ॲन्ड स्टाईल्स, प्लायऊड ॲन्ड सनमायका, पेंट व पेंटींग साहित्य, कॅटर्स ॲन्ड बिछायत केंद्र, स्पोर्टस, टॉईज ॲन्ड म्युझीकल्स इत्यादी तत्सम दुकाने सुरू राहणार आहेत. तर शुक्रवारी आणि शनिवार रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गॅस शेगडी दुरुस्ती, सायकल स्टोर्स, मोबाईल विक्री व दुरुस्ती, संगणक दुरुस्ती, फर्निचर, क्रॉकरी, सायबर कॅफे, कार एसेसरीज, बॅग्ज सेंटर्स, निर्बंध नसलेले डिस्पोझल प्लेट्स ॲन्ड ग्लासेस, सराफा (ज्वेलर्स), आर्टीफिशीअल ज्वेलरी, बँगल्स, गिफ्ट सेंटर व काचेचे (ग्लासेस) इत्यादी तत्सम दुकाने सुरु राहतील.
वरील वस्तूंची सेवा मुभा देण्यात आलेल्या दिवशी व वेळेतच अटीच्या अधीन सुरू ठेवणे आवश्यक आहे. याबाबत दुकान मालकांनी कमीत कमी कामगारासह दुकाने सुरु ठेवावी व सर्व कामगारांनी मास्कचा वापर करावा. दुकानामध्ये काम करतांना आपसामध्ये व ग्राहकामध्ये सामाजिक अंतर ठेवावे. दुकानाच्या प्रवेश द्वारावर हॅन्डवॅश / सॅनिटायझर ठेवण्यात यावा व त्याच्या वापरानंतरच ग्राहकाला दुकानामध्ये प्रवेश द्यावा. दुकान मालकांनी नियमित थर्मल स्क्रिनिंग करण्याची व्यवस्था करावी. दुकानामध्ये कोणालाही कोरोनो सदृश्य लक्षणे दिसून आल्यास त्याबाबत तातडीने महसूल / आरोग्य विभागास कळविणे व स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची जबाबदारी दुकान मलाकाची राहील. दुकानाच्या ठिकाणी नियमित निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करावी. दुकानाच्या ठिकाणी कामगारांना कामाच्या ठिकाणी जाणे व येण्याकरीता दुकान मालकांनी संबंधीत तहसीलदार (Incident Commander) यांच्याकडून पासेस प्राप्त करून घ्याव्यात. आदेशातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री दुकान मालकांनी करावी. तसेच दिलेले निर्देश न पाळल्यास व कोरोना विषाणूंचा सामाजिक स्तरावर फैलाव झाल्यास संपूर्णत: जबाबदारी दुकान मालकाची राहील. हे आदेश दिनांक 17 मे 2020 पावेतो वैध असून यवतमाळ जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राकरीता लागू होणार नाही.
सदर आदेश यवतमाळ जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता जिल्ह्यातील सर्व नागरी व ग्रामीण भागास लागू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. वरील आदेशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम.डी. सिंह यांनी आदेशाद्वारे कळविले आहे.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी