आयसोलेशन वॉर्डातून 124 जणांना सुट्टी


v आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह, एकूण संख्या 80 वर
यवतमाळ, दि.1 :  येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या दोन जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या आता 80 वर पोहचली आहे. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या 124 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
गत 24 तासात दोन जण आयसोलेशन वॉर्डात नव्याने भरती झाले आहे. त्यामुळे भरती असलेल्या रुग्णांची संख्या 141 असून यापैकी 61 प्रिझमटिव्ह केसेस आहेत. तसेच 24 तासात 14 रिपोर्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. यापैकी दोन रिपोर्ट पॉझेटिव्ह आहेत. शुक्रवारी वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरीता सात नमुने पाठविले आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत तपासणीकरीता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या एकूण 1162 असून यापैकी 1155 रिपोर्ट प्राप्त तर सात रिपोर्ट अप्राप्त आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेले एकूण निगेटिव्ह रिपोर्ट 1064 आहे. सद्यस्थितीत संस्थात्मक विलगीकरणात 108 जण असून गृह विलगीकरणात एकूण 1081 जण आहेत. 

          यवतमाळ जिल्ह्यातून बाहेर जाणा-या विस्थापित कामगार / पर्यटक/ भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तिंसाठी तसेच इतर राज्यात व जिल्ह्यात अडकून असलेल्या पर्यटक / विद्यार्थी / यात्रेकरू / कामगार व इतर यांना यवतमाळ जिल्ह्यात येण्यासाठी yavatmal.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
          याबाबत जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी 24 बाय 7 नियंत्रण कक्ष सुरू ठेवणे, इतर राज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करणे, स्क्रीनिंग करणे, त्यांना गृह विलगीकरणाचा शिक्का मारणे, सर्वांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे. त्यांच्याकडून 14 दिवस गृह विलगीकरणात राहणार असल्याचे शपथ पत्र लिहून घेणे आदी सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या. बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार    व-हाडे, तहसीलदार संतोष डोईफोडे, राष्ट्रीय सुचना व माहिती केंद्राचे राजेश देवते, सतिश मून आदी उपस्थित होते.
          सदर माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हा / राज्यासोबत जिल्हा प्रशासनाकडून संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा / राज्याशी समन्वय करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. याबाबत अधिक माहितीकरीता 07232-240720, 07232-240844 आणि 07232-255077 या क्रमांकावर संपर्क करावा, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांनी कळविले आहे.   
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी