जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 16 वर


यवतमाळ, दि.20 : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण वाढीचा वेग मंदावला होता. एवढेच नाही तर 101 पैकी 94 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरीसुध्दा गेले. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या कालपर्यंत (दि.19) सात वर आली होती. मात्र बुधवारी नऊ जणांचा रिपोर्ट नव्याने पॉझेटिव्ह आल्याने आता जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16 वर पोहचली आहे.

            नव्याने पॉझेटिव्ह आलेले हे नऊ रुग्ण पुसद येथील पॉझेटिव्ह रुग्णाच्या अगदी निकटच्या (हाय रिस्क काँटॅक्ट) संपर्कातील असून यापैकी चार दिग्रस, चार पुसद आणि एक जण महागाव येथील आहे. सद्यस्थितीत ते संस्थात्मक विलगीकरणांतर्गत कोव्हिड केअर सेंटर येथे भरती आहेत. पुसद येथील सुरवातीच्या पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एकूण 17 लोकांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले होते. यापैकी 9 पॉझेटिव्ह, 6 निगेटिव्ह आणि 2 रिपोर्ट अप्राप्त आहे.

            तसेच मंगळवारी होडी (ता.पुसद) येथील मृत्यु झालेल्या 55 वर्षीय गौतम कांबळे यांचे नमुने तपासणीकरीता पाठवले असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. सुरवातीपासून आतापर्यंत शासकीय महाविद्यालयाने एकूण 1847 नमुने तपासणीकरीता पाठविले. यापैकी आतापर्यंत 110 पॉझेटिव्ह, 1716 निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले तर 21 रिपोर्ट अप्राप्त आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 14 जण आणि गृह विलगीकरणात 581 जण आहेत.

            कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढल्याने तालुक्यातील तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी. शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे. कुठेही गर्दी करू नये. अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नये. घरातच सुरक्षित रहावे. बाहेर पडल्यास मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या आदेशाचे काटेकारपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी