यवतमाळ व नेर शहर वगळता सकाळी 8 ते 2 या वेळेत मद्यविक्रीला परवानगी

यवतमाळ, दि.11 : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सर्व किरकोळ विक्री अबकारी अनुज्ञप्ती, अनुज्ञप्तीचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत बंद करणेचे आदेश देण्यात आले होते. आता जिल्ह्यातील एफएल – 2/ एफएल – बिआर-2/सीएल-3 अनुज्ञप्तीचे व्यवहार (यवतमाळ व नेर नगर परिषद हद्द वगळून) पुढील आदेशापर्यंत खालील अटीचे अधीन राहून चालू करून देण्याची परवानगी देण्यात येत आहे. तसेच मद्य निर्माणी व मद्याचे घाऊक / ठोक विक्रेत्या एफएल – 1 व सीएल -2 अनुज्ञप्त्या संपूर्ण जिल्ह्यात अटींच्या अधीन राहून चालू करून देण्याची परवानगी देण्यात येत आहे.
मद्य निर्माण्याबाबत (नमुना सीएल – 1 अनुज्ञप्ती) सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेतच व्यवहार सुरु ठेवता येईल. तसेच ग्रामीण भागातील सर्व मद्य निर्माण्या चालू होतील. संबंधीत निर्माणीतील सर्व कामगारांची थर्मल स्कॅनिंग करावी व ज्या कामगारास सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत, त्यास निर्माणीमध्ये प्रवेश देवू नये.
मद्याचे घाऊक / ठोक विक्रेत्याबाबत (अनुज्ञप्ती एफएल – 1, सीएल - 2) सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेतच व्यवहार सुरु ठेवता येणार आहे. घाऊक विक्रेत्यांनी 50 टक्के मनुष्यबळावर काम करावे व सोशल डिस्टेसिंग पाळावे. किरकोळ मद्यविक्री दुकाने  (नमुना एफएल -2/एफएलबिआर-2 तसेच सीएल -3 मद्यविक्री अनुज्ञप्त्या) फक्त उपरोक्त अनुज्ञप्ती प्रकार पुढील निकषांच्या आधारे चालू करता येतील. सदर अनुज्ञप्ती प्रकारातून फक्त सीलबंद मद्यविक्री करण्यास परवानगी राहील.
ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरु करता येतील. तर शहरी भागातील नगरपरिषद हद्दीमधील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री दुकाने चालू करता येणार नाही. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोन वगळून शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील उक्त अनुज्ञप्ती सुरु करता येतील. सीलबंद मद्यविक्री करणाऱ्या दुकानासमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नये व दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फुट अंतर असणे अनिवार्य राहील.
अुनज्ञप्ती सुरु करतेवेळी ग्राहकांना त्या मार्किंगमध्ये उभे राहण्याचे निर्देशित करावे. ज्या नोकरास / ग्राहकास सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत, अशा व्यक्तींना दुकानात प्रवेश देवू नये तसेच दुकानातील प्रत्येक नोकराने व ग्राहकाने डिस्पोजल मास्क आणि ग्लोज वापरणे बंधनकारक राहील. दुकान व सभोवतालचा परीसर दर दोन तासांनी निर्जुंतीकरण करणे आवश्यक राहील. अनुज्ञप्तीमध्ये लॉकडाऊनबाबतची मार्गदर्शक तत्वे पाळण्यासाठी तसेच वाहतूक नियोजनासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमण्याची जबाबदारी मालकाची असेल.
अनुज्ञप्ती सिलबंद मद्यविक्रीसाठी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यरत राहील. मुंबई विदेशी मद्य नियम 1953 च्या नियम 70 डी अन्वये विहीत केलेली मद्य बाळगणे / खरेदी करणे याच्या क्षमतेचा भंग होणार नाही, तसेच कोणत्याही परिस्थितीत आस्थापनामध्ये मद्य प्राशन होणार नाही, याची दक्षता आपण घ्यावी. उपरोक्त मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास अनुज्ञप्ती तात्काळ बंद करण्यात येईल व प्रचलित कायद्यांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशात नमुद आहे.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी