आणखी एका पॉझेटिव्हची भर, एकूण संख्या 19 वर


v आयसोलेशन वॉर्डात 20 जण भरती

यवतमाळ, दि. 30 : रुग्णवाहिकेने मुंबईवरून मृत पॉझेटिव्ह रुग्णाला यवतमाळ येथे आणणा-या तीन चालकापैकी एकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुणांची संख्या एकने वाढून 19 झाली आहे. सध्यास्थितीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 19 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आणि एक प्रिझमटिव्ह केससह एकूण 20 जण भरती आहेत.

शनिवारी रात्री पॉझेटिव्ह रुग्णाला घेऊन खाजगी रुग्णवाहिकेने एकूण पाच जण यवतमाळ येथे आले. येथे पोहचण्यापूर्वीच सदर रुग्णाचा मृत्यु झाला. या रुग्णवाहिकेत तीन चालक आणि मृतकाचा भाऊ यांचा समावेश होता. या चारही जणांना लगेच येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले व त्यांचे नमुने तपासणीकरीता पाठविले. रविवारी सकाळी या तीन चालकापैकी एकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला तर उर्वरीत तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

गत 24 तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 16 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक पॉझेटिव्ह, 14 निगेटिव्ह तर एका रिपोर्टचे निदान अचूक नसल्यामुळे त्याला पुन्हा पाठविण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने आतापर्यंत 2065 नमुने तपासणीकरीता पाठविले. यापैकी एकूण 2060 प्राप्त झाले तर पाच रिपोर्ट अप्राप्त आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 1934 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आजपर्यंत बरे होऊन घरी जाणा-या पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 106 आहे. तर जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्युची नोंद झाली आहे.

संस्थात्मक विलगीकरणात 22 आणि गृह विलगीकरणात एकूण 422 जण आहेत.

000000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी