शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कापसाचा मोबदला त्वरीत द्या


v पालकमंत्र्यांच्या सुचना
यवतमाळ, दि.13 : खाजगी व्यापा-यांच्या आर्थिक पिळवणूकीपासून मुक्त करण्यासाठी शेतक-यांना विक्री केलेल्या कापसाचा मोबदला त्वरीत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी सीसीआय व कापूस फेडरेशनने शेतक-यांकडून खरेदी केलेल्या कापसाचे किंमतीच्या 50 ते 70 टक्के रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ अग्रीम स्वरुपात अदा करावी, अशा सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या दालनात सीसीआय व कापूस फेडरेशनच्या प्रतिनिधींची आढावा बैठक घेण्यात आली. सीसीआय व कापूस फेडरेशन यांनी खरेदी केलेल्या कापसाच्या किंमतीची रक्कम शेतकऱ्यांना साधारणत: 10 ते 20 दिवसानंतर त्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने शेतकरी, खाजगी व्यापाऱ्याकडून काही रक्कम उसनवार घेतात. त्यामध्ये व्यापाऱ्याकडून कापसाचे प्रती क्विंटल 3 ते 4 टक्के प्रमाणे रक्कमेची कपात करण्यात येते. त्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होते.
या दृष्टचक्रातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी विक्री केलेल्या कापसाच्या रक्कमेच्या 50 ते 70 टक्के रक्कम त्वरीत सदर बँकांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून सदर रक्कम शेतकऱ्यांना आवश्यक गरजा भागविण्याकरीता उपयोगी पडेल व शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही. व शेतकऱ्यांना त्यांची शेतीविषयक खरीप हंगामाची कामे तातडीने करता येतील.
सदर बैठकीस कापूस फेडरेशनचे विभागीय व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडियाचे समन्वयक व इतर नागरी सहकारी बँकांचे अधिकारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलडाणा अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसा. चे विभागीय व्यवस्थापक उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी