खेळ पुरस्काराकरिता प्रस्ताव आमंत्रित

मेजर ध्यानचंद्र खेळ रत्न पुरस्कार, जिवन गौरव पुरस्कार, मौलाना अब्दुल कलाम ट्रॉफी अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, खेल प्रोत्साहन करीता नामांकन दाखल करता येणार खेळाडूंना अर्ज सादर करण्यास शिफारशीची आवश्यकता नाही यवतमाळ, दि. 13 सप्टेंबर (जिमाका):- भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जिवनगौरव पुरस्कार, मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन ॲवार्ड, 2022 करीता पुरस्कारासाठी नामनिर्देशनाचा प्रस्ताव दि. 18 सप्टेंबर, 2022 रोजीपर्यंत आमंत्रित केले आहे. तसेच या वर्षीपासुन पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरीता मार्गदर्शक तत्वानुसार अर्जदारांनी स्वत: फक्त ऑनलाईन पोर्टलव्दारे आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची अथवा व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्रशासनास abtyas-sports.gov.in या पोर्टलवर सादर करावे, असे सुचित केले आहे. तसेच ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण आल्यास Department of Sports At section.sp४moyas@gov.in किंवा 011-23387432 या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत करता येईल. तसेच केंद्रशासनाच्या विविध पुरस्काराची सविस्तर माहिती, नियमावली व विहीत नमुना अर्ज https://yas.nic.in/sports या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सन 2022 चे नामांकनाचा प्राप्त प्रस्ताव विहीत मुदतील ऑनलाईन पोर्टलव्दारे अर्ज भरण्यात यावे असे जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपडे यांनी कळविले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी