पी.एम.किसान योजनेत 76 टक्के इ.के.वाय.सी पुर्ण करून यवतमाळ जिल्हा आघाडीवर जमीन तपशील अपलोडची सर्व प्रकरणे महसूल विभागामार्फत निकाली पात्र शेतकऱ्यांनी इ-केवायसी तातडीने पुर्ण करण्याचे प्रशासनाचे आवाहन

यवतमाळ, दि. 13 सप्टेंबर (जिमाका):- शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्माननिधी (पी.एम. किसान) योजने अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात 76 टक्के इ.के.वाय.सी. चे काम पुर्ण करून यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. इ-केवायसी साठी आवश्यक असलेले जमीन तपशील अपलोड करण्याचे काम महसूल विभागामार्फत पुर्ण करण्यात आले आहे, तरी उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर इ-केवायसी पुर्ण करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे. इ.के.वाय.सी. चे काम पुर्ण करण्यासाठी महसूल विभागाला चार लाख 12 हजार 16 प्रकरणात जमीनीचा तपशिल अपलोड करावयाचा होता. त्यापैकी 78 हजार 23 रेकॉर्ड मय्यत किंवा अपात्र ठरल्याने वगळण्यात आली व तीन लाख 33 हजार 993 प्रकरणात जमीनीचा तपशिल ऑनलाईल अपलोड करण्यात येवून लॅण्ड डाटा डिटेल्स अपलोडची सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्याची माहिती ललीतकुमार वऱ्हाडे यांनी दिली आहे. पी.एम.किसान योजनेंतर्गत पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी 3 लाख 32 हजार 321 साभासदांचे आधार प्रमाणिकरण पुर्ण झाले असून 2 लाख 53 हजार 650 शेतकऱ्यांची इ-के.वाय.सी. पुर्ण झाली आहे. इ-केवायसीचे उर्वरित 24 टक्के काम पुढील 15 दिवसात पुर्ण करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ प्राप्तीची प्रक्रीया सुलभ व सुरळीत होण्याच्या उद्देशाने त्यांचे बँक खाते इ-केवायसी करणे शासनाने बंधनकारक केले होते. माहे सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी