कृषी व पशुपालन प्रशिक्षणासाठी कोलाम लाभार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

यवतमाळ, दि. 13 सप्टेंबर (जिमाका):- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत येत असलेल्या यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, राळेगांव, मारेगांव, वणी, केळापूर, घाटंजी, झरी-जामणी या 9 तालुक्यातील आदिम जमातींचे कोलाम लाभार्थ्यांसाठी आदिम जमाती विकास कार्यक्रम अंतर्गत कृषी आणि पशुपालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून यासाठी आदिम जमातींचे कोलाम लाभार्थ्यांची तसेच कुमारी मातांची निवड करावयाची आहे. सदर योजनेचा लक्षांक -300 आहे. उक्त योजनेत कोलाम लाभार्थ्यांना शेतातील एकात्मिक रोग, कीड नियंत्रण व कृषि उत्पादनात वाढ, सेंद्रिय शेती व पध्दती, मृदा संवर्धन , शेळी पालन, कुक्कुटपालन व व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन, कृषि माल प्रक्रिया व विपणन, जल व्यवस्थापन, पांढरकवडा प्रकल्पामध्ये असणाऱ्या कुमारी माता यांना कृषी आधारित उत्पादन वाढ व रोजगार निर्मितीचे प्रशिक्षण इत्यादी शेतीबाबतची अद्यावत माहिती आदिम जमातीच्या कोलाम लाभार्थ्यांना व कुमारी मातांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर योजने करीता पात्र ठरण्यासाठी प्रशिक्षणासाठी शेतकरी हा आदिम जमातीचा (कोलाम) असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना शेती करण्याची रुची असणे आवश्यक आहे. योजने करीता निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांला संपुर्ण प्रशिक्षण पुर्ण करणे आवश्यक राहील. उक्त योजनेचा अर्ज प्रकल्प कार्यालयाच्या सेतु केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी इच्छुकांनी आपला अर्ज भरून कार्यालयात सादर करावा असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी