गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी बंधन प्रकल्पावर मार्गदर्शन

यवतमाळ, दि 5 सप्टेंबर : कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, ॲग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपूर, साउथ ऐशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर यांचे संयुक्त विद्यमाने तसेच कृषी विभाग, यवतमाळ व ॲफ्रो, यवतमाळ यांचे सहकार्याने कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन बंधन प्रकल्प हा घाटंजी तालुक्यातील रामपूर गावात ६० एकरवर व उंदरणी गावात ८५ एकरवर राबविण्यात आला आहे. या अनुषंगाने दिनांक ०१ सप्टेंबर, २०२२ रोजी रामपूर गावात तर ०२ सप्टेंबर रोजी उंदरणी गावात पी बी नॉट तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणाकरिता प्रात्येक्षिक स्वरूपामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी साउथ ऐशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर चे संचालक भगीरथ चौधरी, सी.आय.सी.आर. नागपूर चे शास्त्रज्ञ. डॉ. चीन्नाबाबू, शास्त्रज्ञ डॉ. रामकृष्णाजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, , पोलीस पाटील राजेंद्र पाटील, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, मंडळ कृषी अधिकारी अमोल मंचलवार, गजेंद्र चवळे, राहुल पंचभाई तसेच कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर, राहुल चव्हाण, मयूर ढोले, राधेश्याम देशमुख, सहायक सुमित काळे, भरतसिंग सुलाने उपस्थित होते. याप्रसंगी भगीरथ चौधर यांनी तांत्रिक पद्धतीने कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाकरिता वापरण्यात येणाऱ्या पी.बी. नॉट तंत्रज्ञाना विषयी सखोल माहिती दिली तर नवनाथ कोळपकर, यांनी सदर प्रकल्पात शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. शास्त्रज्ञ डॉ. चीन्नाबाबू यांनी कापूस पिकातील कामगंध सापळे वापर विषयी सखोल माहिती दिली तर डॉ. रामकृष्णाजी यांनी विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून अवाजवी खर्च कमी कसा करावा या विषयी माहिती दिली. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी बंधन प्रकल्पाचे उद्देश व महत्त्व या प्रंसगी विषद केले. डॉ. प्रमोद मगर यांनी पी बी नॉट तंत्रज्ञानाचा वापर व कापूस पिकामध्ये पिवळे चिकट सापळे यांचा वापर या विषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ॲफ्रोतील अधीकारी तथा कर्मचारी संदीपभाऊ कोटेकर, अमोल सोनटक्के, रजनी पेंदल, मंगला धुर्वे व रोशन गंधे, बंधन प्रकल्प सहकारी यांनी सहभाग नोंदविला. तसेच उंदरणी व रामपूर या गावातील शेतकरी बांधवानी पी बी नॉट तंत्रज्ञानाचा स्वीकृत करून संबंधित शेताच्या क्षेत्रामध्ये पी बी नॉट धागा कपाशी पिकावर बांधून घेतला. यावेळी मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय व वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्याल येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी