ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 20 सप्टेंबर पर्यंत सुरू उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि 15 सप्टेंबर ( जिमाका ):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन सुरू असून ते 20 सप्टेंबर 2022, पर्यंत राहणार आहे. स्थानिक पातळीवर तसेच इतर बाहेरील ठिकाणी औद्योगिक संस्थांच्या मागणीनुसार एकूण 78 रिक्त पदांकरीता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्याकरीता जिल्हयातील ईच्छुक उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. सदर मेळाव्यामध्ये किमान 12 वी परिक्षा उत्तीर्ण झालेले रोजगार इच्छुक उमेदवारांना त्यांचेकडील सेवायोजन कार्ड ( एम्प्लॉएमेंट कार्ड ) चा युझरनेम व पासवर्डने लॉगईन करुन सदर मेळाव्यामध्ये सहभागी होता येईल. या वेबपोर्टलवर जॉब सिकर या टॅब मध्ये जावून लॉगीन करावे. डाव्या बाजूला पं. दिनदयाल उपाध्याय जॉब फेयर या वर क्लिक करावे. येथे यवतमाळ जिल्हा निवडून दि.12 सप्टेंबर,2022 ते 20 सप्टेंबर 2022 दरम्यान रोजगार मेळाव्यामध्ये नोंदणीकृत उद्योजकांनी अधिसूचित केलेल्या रिक्तपदांच्या पसंतीक्रमानुसार अप्लाय या टॅब वर क्लिक करुन मेळाव्यामध्ये सहभागी होता येईल. या मेळाव्याचा अधिक माहितीकरीता 07232-244395 या क्रमांकावर संपर्क साधावा. सदर मेळाव्यास उद्योजकांकडून ऑनलाईन पध्दतीने मुलाखती / उमेदवारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून रिक्तपदांकरीता निवड करण्यात येणार आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी