या बालकांचे पालक कोण ? बालकल्याण समितीकडे संपर्क साधण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 9 सप्टेंबर (जिमाका):- शासकीय निरीक्षणगृह व बालगृह येथे बालिका भाग्यश्री अमरसिंह राठोड, रेणुका हरिभाऊ चव्हाण, बालक जयहिंद भीमराव राठोड, पंकज संजय जाधव, ही बालके वास्तव्यास असून बालकल्याण समितीद्वारे त्यांच्या पालकांचा शोध घेणे सुरू आहे. उपरोक्त चारही बालकांच वय 16 वर्ष असून ते सर्व स्व. विद्यारतन वडते बालगृह, धुंदी, तालूका पुसद या बालगृहात दाखल झालेले आहेत. प्रवेशित बालकास त्याचे पालक व नातेवाईक इतर कोणीही भेटण्यास आलेले नाही. ही बालके बालगृहात दाखल झाल्यापासून त्याचे पालक व नातेवाईक इतर कोणीही भेटण्यास आलेले नाही. जिल्हा बालकल्याण समितीद्वारे त्यांचा शोध घेण्यात येत आहे. तरी सदर बालकाच्या पालक आणि नातेवाइकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी पुढील 30 दिवसांच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यवतमाळ, अध्यक्ष, बाल कल्याण समिती यवतमाळ किंवा अधीक्षक, स्व. विद्यारतन वडते बालगृह, धुंदी, तालूका पुसद येथे तसेच 8766717125 व 986000118 या मोबाईल नंबरवर किंवा बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) जिल्हा बालसंरक्षण कक्ष, यवतमाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय निरीक्षणगृह/बालगृह (मुलांचे) चे अधिक्षक आशिष राठोड यांनी केले आहे 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी