कोविड सानूग्रह अनुदान मिळण्यासाठी बँक खाते आधार लिंक करावे

निवासी उपजिल्हाधिकारी यांचे पात्र अर्जदारांना आवाहन यवतमाळ, दि. 7 सप्टेंबर (जिमाका):- कोविड-19 आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रुपये 50 हजार सानूग्रह सहाय्य प्रदान करण्याची योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेखाली ऑनलाईन पध्दतीने काही पात्र अर्जदारांच्या बँक खात्यात रुपये 50 हजार इतके सानूग्रह अनुदान NEFT/ABPS प्रणाली द्वारे जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. परंतू काही अर्जदार यांनी चुकीची बँक खात्याबाबत माहिती भरल्याने, बँक खात्याशी आधार लिंक नसल्याने त्यांना सानुग्रह मदत शासन स्तरावरुन जमा करण्यात आलेली नाही. करीता ज्या अर्जदारांनी अर्ज केला परंतु त्यांचे खात्यात सानुग्रह अनुदान जमा झाले नाही त्या अर्जदारांनी अर्जाचा टोकन आयडी, अर्जासोबत जोडलेले बँक खाते पासबुक व राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुक घेऊन आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे कार्यालयीन वेळेत भेट देऊन अर्जाबाबतची माहिती अद्यावत करण्यास सहकार्य करावे, जेणे करुन संबंधित अर्जदारास सानुग्रह अनुदान मिळवून देण्याकरीता योग्य कार्यवाही करता येईल असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी