केळापूरच्‍या श्री जगदंबा देवस्‍थानाच्‍या ठिकाणी विविध विकासकामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत

सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भाविकांना नवरात्रोत्‍सवाची अनोखी भेट यवतमाळ, दि २९ जिमाका: राज्‍याचे वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने यवतमाळ जिल्‍हयातील जगदंबा संस्‍थान केळापूर येथील विविध विकासकामांकरिता मंजूर ५ कोटी रू. निधी पैकी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यात आला आहे. पर्यटन व सांस्‍कृतिक कार्य विभागाने आज दिनांक २९ सप्‍टेंबर २०२२ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जगदंबा संस्‍थानच्‍या भाविकांना नवरात्रोत्‍सवाची अनुपम भेट दिली आहे. यवतमाळ जिल्‍हयातील केळापुर तालुक्‍यातील जगदंबा संस्‍थान, केळापूर हे अतिशय जागृत देवस्‍थान आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत सन २०१९-२० मध्‍ये या धार्मीक स्‍थळाच्‍या ठिकाणच्‍या विविध विकासकामांसाठी ५ कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला होता. मात्र या विकासकामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी अप्राप्‍त होता. हा निधी उपलब्‍ध व्‍हावा यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी तब्‍बल दोन वर्षे सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला. विधानसभेत संसदीय आयुधांच्‍या माध्‍यमातुन देखील हा मुद्दा त्‍यांनी रेटला. अखेर दिनांक २९ सप्‍टेंबर २०२२ च्‍या शासन निर्णयान्‍वये जगदंबा संस्‍थान येथील विविध विकास कामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यात आला आहे. याठिकाणी भक्‍त निवास, फर्निचर, पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता, आंतर व बाह्य विद्युतीकरण, अग्‍नीशमन व्‍यवस्‍था, अंतर्गत रस्‍ते बांधकाम, सिमेंटकॉंक्रीट नाली बांधकाम, वातानुकुलीकरण, जलशुद्धिकरण यंत्र, सिसिटिव्‍ही सिस्‍टीम, वृक्ष लागवड, वृक्ष कुंपण आदी व्‍यवस्‍थांचा अंतर्भाव आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने श्री जगदंबा संस्‍थान येथे येणा-या भाविकांसाठी या माध्‍यमातुन सोयीसुविधा उपलब्‍ध होणार असून यंदाच्‍या नवरात्रोत्‍सवात भाविकांना त्‍यांच्‍या माध्‍यमातुन अनोखी भेट देण्‍यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी