नैसर्गिक शेती कार्यशाळा कळंब येथे संपन्न

यवतमाळ, दि 5 सप्टेंबर : कृषी विज्ञान केंद्र व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद), यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने नुकतेच कळंब येथे एक दिवसीय नैसर्गिक शेती कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक तसेच प्रमुख अतिथी व मार्गदर्शक शुभ्रकांत भगत, तालुका कृषी अधिकारी, कळंब व उमेद चे भास्कर कुमरे, तालुका अभियान व्यवस्थापक, कळंब मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामधे डॉ. सुरेश उ. नेमाडे, यांनी जमिनीचा सेंद्रिय कर्ब नैसर्गिक पद्धतीने कसे वाढवावा या विषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच पिकाचे उत्पादन वाढविण्याकरिता सेंद्रिय खतांचा वापर असे अवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, यांनी नैसर्गिक शेती कार्यशाळाचे महत्त्व व उद्देश या प्रंसगी विषद केले. तालुका कृषी अधिकारी शुभ्रकांत भगत यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची सखोल माहिती दिली. याप्रसंगी उमेद चे भास्कर कुमरे, शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर, डॉ. गणेश काळूसे, राहुल चव्हाण, यांनी देखील मार्गदशन केले. कार्यक्रमाचे संचालन रजनी जाधव यांनी केले तर नितीन गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला उमेदचे सर्व तालुका व्यवस्थापक व सर्व प्रभाग समन्वयक, कृषी सखी, पशु सखी, उद्योग सखी इ. उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी