साक्षरता दिननिमित्य विद्यार्थीनींना शालेय साहित्याचे वाटप जिल्हा विधी सेवा व व अभ्यंकर कन्या शाळेचा उपक्रम

यवतमाळ, दि १5 सप्टेंबर ( जिमाका ):- शालेय जिवनात शिस्तीने राहुन आनंद घ्यावा असा संदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी विद्यार्थ्यांना दिला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अभ्यंकर कन्या शाळा यांचे संयुक्त विद्यमाने नुकतेच साक्षरता दिनानिमित्त विद्यार्थीनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के. ए. नहार, अे.पी. दर्डा संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र अग्रवाल, रमेश मुनोत, मोहन गांधी, किशोर देशमुख, मुख्याध्यापिका मोहना गंगमवार, जोशी सर व इतर शालेय शिक्षक वर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये उपस्थीत मान्यवरांचे हस्ते 267 विद्यार्थीनींना शालेय गणवेश, नोटबुक व कंपासचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका माधवी जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार विद्या मेश्राम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी