शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथील विद्यार्थ्यांचे सुयश

यवतमाळ, दि. 28 सप्टेंबर - शासकीय तंत्रनिकेतन खामगाव तर्फे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या टी.इ.सी.टी.- के.एम.इ.टी.- 2022 स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथील सिव्हील इंजिनिरिंग मधील दिशा मोगरे तृतीय वर्ष व देवजी मनीष येंडे, हर्ष विनोद भोंग ईलेक्ट्रोनिक्स इंजिनिरिंग यांनी प्रथम क्रमांक तसेच प्रगती खोलापुरे, तोष्वी पठाडे मेक्यानिकल इंजिनिरिंग यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यवतमाळ तर्फे आयोजित सर्किट डिझाईन स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथील ईलेक्ट्रोनिक्स इंजिनिरिंग मधील गुरुप्रीतसिंग राठोड व अमित राठोड यांनी प्रथम क्रमांक, साहिल ठाकरे आणि यश येडलवार यांनी द्वितीय क्रमांक तसेच पारस गोहाने आणि प्रियंका राठोड यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ चे प्राचार्य डॉ.आर.पी. मोगरे तसेच सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापकांनी अभिनंदन केले. --

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी