अपघातग्रस्त शेतकऱ्यांना गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा आधार

यवतमाळ दि,21, जिमाका :- शेती करताना नैसर्गिक व अनैसर्गिक अपघातामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा कायमचे अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितित अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास आधार देण्याकरीता राज्य शासनाने स्व. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागु केली आहे. महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (आई,वडिल, शेतकर्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकुण दोन व्यक्क्तिंसाठी आता या योजनेचा लाभ देण्यात येतो. विमा संरक्षणासाठी समाविष्ट असलेले अपघात रस्ता, रेल्वे अपघात, उंचावरून पडून मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघात, विजेचा धक्का, दंगलीमुळे शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व, वीज पडून मृत्यू, सर्पदंश आणि विंचू दंश नुकसान भर्पाइची रक्कम ? १- शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू- 2 लाख.रु. २- अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे - 2 लाख रु. ३- अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा एक पाय निकामी होणे - 1 लाख रु. वैशिष्ट्य : कोणताही विमा काढताना विमा धारकास विमा हप्ता भरावा लागतो. मात्र गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यसाठी कोणत्याही शेतक-यास कोणत्याही विमा कंपनीकडे विमा हफ्ता भरण्याची गरज नाही. सर्व शेतकरयांची विमा हप्त्याची रक्कम शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते. आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील पूर्व सुचनेचा अर्ज, 7/12 उतारा किंवा 8अ.(मुळ प्रत),मृत्यू दाखला (स्वयं साक्षांकीत प्रत),प्रथम माहिती अहवाल(एफ.आय आर), विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला मृत्यू, सर्प दंश/ विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलिस पाटील अहवाल, घटनास्थळ पंचनामा (स्वयं साक्षांकीत प्रत), वयाचा दाखला (नसल्यास शपथपत्र),सदरचा दावा दुर्घटनेनंतर शक्यतो 45 दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा. खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका (राजपत्रीत अधिकारी यांनी स्वाक्षांकीत केलेली). मागिल तीन वर्षात शेतक-यांना मिळलेला लाभ सन 2019-20 - 204, 2020-21 - 52, 2021- 22 -244 आणि 2022-23 (ऑगस्ट पर्यंत) 33 अशा एकुण 533 शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. अर्ज कुठे करावा ? या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावा. अधिक माहिती साठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी