कौटुंबिक हिंसाचार मुक्त गाव अभियान राबवावे -जिल्हाधिकारी अमोल एडगे

जिल्हा महिला सल्लागार समितीच्या बैठकीत सूचना यवतमाळ, दि १२ :- महिलांना घरात सुरक्षित वातावरण मिळावे, त्यांच्यावर होणा-या अत्याचाराबाबत त्यांना कायदेशिर माहिती मिळावी, महिलांमध्ये महिलांविषयीच्या कायद्याबाबत समज यावी आणि गावात कोणत्याही महिलेवर अत्याचार होणार नाहीत याबाबत मोठ्या प्रमाणात नगरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कौटुंबिक हिंसाचार मुक्त गाव अभियान राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांनी आज दिल्यात. सर्व समावेशक जिल्हा महिला सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीला महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एल. आगाशे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील डॉ. रमा बाजोरिया,माविमचे जिल्हा समन्वयक डॉ रंजन वानखेडे, स्नेहा खडसे, सुरेश रामटेके, डॉ स्मिता पेठकर आणि के बी शर्मा इत्यादी उपस्थित होते. जिल्हास्तरावरील सर्व विभागांमार्फत महिलांकरिता असणाऱ्या वैयक्तिक, सामूहिक तसेच निवासी योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. यामध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमाच्या परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यात. या कायद्याची जनजागृती करण्यासाठी ग्रामीण भागातील महिला लोकप्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेविका, आरोग्य सेविका, आशा वर्कर यांना या कायद्याबाबत माहिती देण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सुचना दिल्यात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विद्यार्थिनींना स्व: संरक्षणाचे धडे देण्यासाठी प्रशिक्षण घेण्याच्या सूचना त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचर्यांना दिल्यात. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सोनोग्राफी केंद्राची तपासणी करण्यात यावी. तसेच तक्रार असल्यास तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी