तोफखाना रजिमेंटच्या माजी सैनिकच्या समस्या सोडविण्यासाठी 19 सप्टेंबरला संपर्क अभियान

यवतमाळ, दि. 13 सप्टेंबर (जिमाका):- तोफखाना रजिमेंटचा “196 वा गनर डे” दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये आर्टीलरी रजिमेंटचे सेवानिवृत्त अधिकारी / जवान तसेच आर्टीलरी रजिमेंटच्या माजी सैनिक विधवांच्या निवृत्तीवेतन, ई.सी.एच.एस. हॉस्पिटल, इन्शुरन्स कंपनीच्या अडि-अडचणी सोडविण्याकरिता संबंधित कार्यालयाच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले आहे. यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपुर जिल्ह्यातील आर्टीलरी रजिमेंटचे सेवानिवृत्त अधिकारी / जवान तसेच आर्टीलरी रजिमेंटच्या माजी सैनिक विधवांच्या अडिअडचणी समजून घेण्याकरीता दिनांक 19 सप्टेंबर 2022 (सोमवार) रोजी दुपारी 4 वाजता संपर्क अभियानाचे आयोजन यवतमाळ येथे करण्यात येत असल्याबाबत कर्नल संदिप श्रीवास्तव, कमान अधिकारी, 169 मेडियम रजिमेंट यांनी कळविले आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील आर्टीलरी रजिमेंटच्या सेवानिवृत्त अधिकारी / जवान तसेच आर्टीलरी रजिमेंटच्या माजी सैनिक विधवांनी त्यांच्या अडिअडचणी / तक्रारी असल्यास संबंधीत कागदपत्रासह दिनांक 19 सप्टेंबर 2022 (सोमवार) रोजी दुपारी 4 वाजता संपर्क अभियान अधिकाऱ्यांना भेटावे तसेच अधिक माहितीकरीता दुरध्वनी क्रमांक. 07232-245273 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी