बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणीचे विशेष शिबीर

यवतमाळ, दि. 15 सप्टेंबर (जिमाका):- सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात 12 वी विज्ञान तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास ईच्छुक विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणी समितीद्वारे उपविभागीय स्तरावर जात प्रमाणपत्र पडताळणीचे शिबीरे आयोजीत करण्यात आली आहेत. यवतमाळ उपविभागामध्ये शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय, बाभुळगाव येथे 20 सप्टेंबर रोजी, दारव्हा उपविभागामध्ये मुंगसाजी महाराज महाविद्यालय,दारव्हा येथे 23 सप्टेंबर रोजी, पुसद उपविभागामध्ये बाबासाहेब नाईक इंजिनियरींग महाविद्यालय, पुसद येथे 27 सप्टेंबर रोजी, उमरखेड उपविभागामध्ये गोपिकाबाई सितारामजी गावंडे कॉलेज उमरखेड येथे 30 सप्टेंबर रोजी, वणी उपविभागामध्ये लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे 7 सप्टेंबर रोजी, राळेगाव उपविभागामध्ये इंदिरा गांधी कला महाविद्यालय राळेगाव येथे 11 ऑक्टोबर रोजी, तर केळापुर उपविभागामध्ये शिवरामजी मोघे महाविद्यालय केळापुर (पांढरकवडा) येथे 14 ऑक्टोबर 2022 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीरात सन 2022-23 मधील 12 विज्ञान शाखेतील प्रवेशीत विद्यार्थी यांनी https:// bartievalidity.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा उपयोग करुन परिपुर्ण भरलेला अर्ज व मूळ कागदपत्रासह उपस्थीत रहावे. अर्जदाराचा जातीचा दाखला यवतमाळ जिल्ह्यातील असावा व अर्जदार हा अनुसुचित जाती (SC), विमुक्त जाती भटक्या जमाती (VJNT), विशेष मागासवर्ग (SBC) व इतर मागासप्रवर्ग (OBC) याच प्रवर्गाचे अर्ज समितीकडुन स्वीकारले जातील व त्याचे पडताळणी केली जाईल. अधिक माहितीकरीता विद्यार्थींनी आपल्या महाविद्यालयातील प्राचार्य यांचेशी संपर्क करावा. ज्या विदयार्थींचे अर्ज परिपुर्ण असतील त्या विदयार्थींना त्याच ठिकाणी आपले जात वैधता प्रमाणपत्र समितीकडुन देण्याचा समितीचा मानस आहे. परिपुर्ण अर्जाकरीता आवशक असलेल्या कागदपत्रे व पुरावाची यादीकरीता https://yavatmal.gov.in/notice_category/announcements/ या ठिकाणी भेट देण्यात यावी त्यानुसार कागदपत्रे सादर करावी. वरीलप्रमाणे प्रत्येक उपविभागात एक या प्रमाणे शिबीरे आयोजीत केलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एकही विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्रा अभावी प्रवेशापासुन वंचीत राहु नये हा शिबीराचा मुळ उद्देश आहे. तरी विद्यार्थीनी शिबीरात मोठया प्रमाणात सहभागी होऊन आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य सचिव मंगला मुन यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी