शासकीय तंत्रनिकेतनमध्ये स्वच्छता व आरोग्य यावर व्याख्यान संपन्न

यवतमाळ, दि. 7 सप्टेंबर :- ग्रीन कॅम्पस इनिशिएटिव्हस अंतर्गत शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ येथे स्वच्छ भारत मिशनचे समाजशास्त्रज्ञ महेंद्र गुल्हाने यांचे स्वच्छता व आरोग्य जागरूकता या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान नुकतेच संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. पी. मोगरे हे होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते महेंद्र गुल्हाने यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, घरातील स्वच्छता व परिसरातील स्वच्छता कशी ठेवता येईल याबाबत सप्रयोग सखोल मार्गदर्शन केले. वरील कार्यक्रमाकरिता ग्रीन कॅम्पस इनिशिएटिव्हस या उपक्रमाचे समन्वयक एन. पी. ताठे, सर्व विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी/कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय विज्ञान विभाग नियंत्रक उज्वला शिरभाते यांनी करून दिला, तसेच या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत सब्बनवार यांनी केले. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी