किसान क्रेडीट कार्ड प्रदान करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत विशेष मोहीम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 8 सप्टेंबर (जिमाका) :- पी.एम. किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 1 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीमधे विशेष मोहीमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत ज्या पी. एम. किसान लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडीट कार्ड नाही त्यास नविन किसान क्रेडीट कार्ड देणे, ज्या लाभार्थी शेतकऱ्यांमकडे किसान क्रेडीट कार्ड आहे त्यांना आवश्यकतेनुसार मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन साठी वाढीव कर्जमर्यादा मंजुर करणे, आणि ज्या लाभार्थी शेतकऱ्यांकडील किसान क्रेडीट कार्ड अक्रियाशील आहे ते क्रियाशील करणे ही या मोहिमेची उद्दिष्ट्ये आहेत. जिल्ह्यातील ज्या पी.एम.किसान लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडीट कार्ड सुविधा नाही, अशा सर्व शेतकरी बांधवांनी त्वरीत आपले बँक शाखेशी संपर्क करून किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करुन घ्यावे व या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांनी बँकेचे निकषानुसार पिक कर्जवाटपाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाचे वतीने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा अग्रणी प्रबंधक अमर गजभिये व जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद