जिल्ह्यात 28 सप्टेंबर रोजी विशेष आधार नोंदणी शिबीर नागरिकांनी आधार नोंदणीसाठी विशेष शिबीराचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 22 सप्टेंबर (जिमाका):- जिल्ह्यातील नागरिकांकरिता सर्व तालुक्यात दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी विशेष आधार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी आपली आधार नोंदणी करून शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे तर सर्व तालुका स्तरावर तहसिलदार यांचे मार्फत संपुर्ण जिल्ह्यात 28 सप्टेंबर या एकाच दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत आधार नोंदणी शिबीर आयोजित केले आहे. शिबीरात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला व लहान बालके यांना प्राधान्य देण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी