कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल



कृषी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 01 : शेतकऱ्यांना विविध कृषी योजना व उपक्रमांची माहिती व्हावी, संशोधित कृषी तंत्रज्ञान, शेतकऱ्यांचे  स्वताचे अनुभव, बाजारपेठबाबतची माहिती इत्यादीबाबत शेतकऱ्यांना माहिती होण्याच्यादृष्टीने कृषी महोत्सवाचे समता मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रदर्शनीमध्ये पाच दालने तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये  शासकीय दालन, कृषी संलग्न कंपन्यांचे दालन, धान्य महोत्सवाचे दालन, परिसंवाद व चर्चासत्र दालन, सेंद्रीय शेतमाल विक्री दालन यांचा समावेश आहे. सदर प्रदर्शनामध्ये 186 स्टॉलची उभारणी करण्यात आली असून त्यामध्ये बचत गटांना विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतीमध्ये सिंचनाचा प्रभावीपणे वापर व्हावा या उद्देशाने संरक्षित सिंचन या बाबीखाली ठिंबक, तुषार संचाची माहिती देण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भावाबाबत तसेच पिकावर किटकनाशकांची फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, रोपवाटिका व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा करता यावा या उद्देशाने विविध कृषी संलग्न विभाग जसे रेशिम, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन ईत्यादीबाबत माहिती या महोत्सवात उपलब्ध आहे.
महिला शेतकरी संख्या उल्लेखनीय असून सदर मेळाव्यामध्ये शासकीय दालनामध्ये शेतकऱ्यांना कृषी विषयक योजनांची माहिती तसेच उत्कृष्ट पध्दतीची विविध फळे, भाजीपाला व पुष्पे इत्यादीचे नमुने तसेच पाणलोटामधील विविध जल व मृदसंधारण कामाचे महत्व सांगण्यासाठी प्रात्यक्षिक ठेवण्यात आले. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला दर्जेदार मालाची (जसे. कडधान्य, गळीतधान्य, दुग्धजन्य पदार्थ, सेंद्रीय फळे व भाजीपाला) थेट विक्री ग्राहकांना करत आहेत, यास उर्त्फुत प्रतिसाद मिळत आहे. सदरचा उपक्रम हा शेतकरी ते ग्राहक थेट विक्री बाबतच्या शासन धोरणारुप शेतकऱ्यांना व ग्राहकांना लाभदायक ठरत आहे. शेतकऱ्यांना नवनविन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने शास्त्रज्ञ, अनुभवी शेतकरी, प्रगतीशिल, प्रयोगशील शेतकरी यांना परिसंवादाच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी दोन सत्रामध्ये माहिती देण्यात येत आहे. यासाठी शेतकरी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन त्यांना येणाऱ्या अडचणीबाबत प्रश्न विचारुन माहिती घेत आहेत. हा महोत्सव दिनांक 3 मार्च 2019  अखेर चालणार असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे  आवाहन प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी