14-यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ पहिल्या दिवशी दोन उमेदवारांचे नामांकन दाखल


यवतमाळ, दि. 18 : 14 -  यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्याच दिवशी दोन उमेदवारांचे नामांकन दाखल झाले. भारतीय बहुजन आघाडीच्या वतीने पवार रमेश गोरसिंग यांनी तर अपक्ष म्हणून सुनील नटराजन नायर यांनी अर्ज दाखल केला. तसेच रमेश पवार यांनी जनता दल (से) तर्फेसुध्दा नामांकन दाखल केले.    
नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिनांक 25 मार्च 2019 असून उमेदवारांच्या पत्राची छाननी 26 मार्च रोजी करण्यात येईल. 28 मार्चपर्यंत उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे.
००००००

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी