निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पोलीस विभागाचा आढावा
यवतमाळ, दि. 13 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 च्या पार्श्वभुमिवर
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा नियोजन सभागृहात पोलीस विभागाचा आढावा
घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार
वऱ्हाडे आदी उपस्थित होते.
निस्पक्ष: आणि मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व विभागाचा
समन्वय आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे म्हणाले, जिल्ह्यात
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस
विभागाला नागरिकांनी सहकार्य करावे. अप्रिय घटना त्वरीत लक्षात आणून द्याव्यात, आदी
सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
यावेळी कायदा व सुव्यवस्था, शस्त्र जप्त, प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपार व
इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यात आला. बैठकीला वाशिम व कारंजा येथील सहायक
निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गोगटे आणि अनुप खांडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी,
पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.
0000000


Comments
Post a Comment