उमरी येथील हुतात्मा स्मारकासाठी 28 लाखांचा निधी


पालकमंत्र्यांचा पाठपुरावा
यवतमाळ, दि. 08 : बाभुळगाव तालुक्यातील उमरी येथील हुतात्मा स्मारकाच्या देखभाल दुरुस्ती / नुतणीकरणासाठी 28 लाखांचा निधी वितरीत करण्याला मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री मदन येरावार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्ती संग्राम तसेच गोवा मुक्ती आंदोलन यामध्ये भाग घेऊन ज्यांनी देशासाठी प्राणार्पण केले, अशा व्यक्तिंच्या स्मरणार्थ शासनाने राज्यात 206 हुतात्मा स्मारके उभारली आहेत. सदर स्मारकांच्या बांधकामाला 35 जे 40 वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे या स्मारकांची दुरुस्ती / नुतणीकरण करण्यासाठी सन 2015-16 च्या अर्थसंकल्पात 25 कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार सन 2016-17 व 2017-18 मध्ये सदर निधी संबंधित जिल्हाधिका-यांच्या स्वाधीन करण्यात आला. काही हुतात्मा स्मारकांची कामे शिल्लक असल्याने 2018-19 च्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या मंजूर निधीतून उमरी (ता. बाभुळगाव) येथील हुतात्मा स्मारकाच्या दुरुस्ती व नुतणीकरणासाठी 27 लक्ष 92 हजार 200 इतका निधी यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्याकडे वितरीत करण्यात आला आहे.
हा निधी दहा कामांवर खर्च करायचा आहे. यात पेव्हर ब्लॉक रस्ता, स्लायडिंग विंडोज, शौचालय, पाण्याची टाकी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्षारोपण व बगीचा, पाणीपुरवठा व विद्युतीकरण, वातानुकुलन, अग्निशमन यंत्रणा आणि आर.सी.सी. बेंचेसचा समावेश आहे. याबाबतच्या प्रशासकीय मान्यता देणे, निविदा प्रक्रिया पार पाडणे व अन्य आवश्यक प्रशासकीय बाबी जिल्हाधिका-यांनी त्यांच्या स्तरावर तात्काळ पूर्ण कराव्यात, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
००००००

                                                                             


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी