14 – यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाकरीता शेवटच्या दिवशी 26 उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशनपत्र, मतदान करण्याकरीता भरपगारी सुट्टी अथवा तीन तासांची सवलत

v आतापर्यंत एकूण 37 उमेदवारांचे नामांकन
      यवतमाळ, दि. 25 : 11 एप्रिल 2019 रोजी यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. या मतदारसंघासाठी आज (दि. 25) शेवटच्या दिवशी 26 उमेदवारांनी  नामनिर्देशनपत्र दाखल केले. यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत 37 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे.
            नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 18 मार्च रोजी दोन उमेदवारांनी, 20 मार्च रोजी दोन उमेदवारांनी, 22 मार्च रोजी 7 उमेदवारांनी आणि शेवटच्या दिवशी 25 मार्च रोजी 26 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. आतापर्यंत 37 उमेदवारांनी एकूण 51 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
००००००

v आस्थापनाविरुध्द तक्रार आल्यास होणार कारवाई
      यवतमाळ, दि. 25 : मतदानाच्या दिवशी विविध आस्थापनांनी आपल्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी किंवा तीन तासांची सवलत द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अशी सुट्टी किंवा सवलत प्राप्त न झाल्यास किंवा याबाबत तक्रार आली तर संबंधित आस्थापनाविरुध्द कारवाई करण्यात येईल.
मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या परिच्छेद 135 ब नुसार निवडणूक होत असलेल्या मतदार संघातील उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदी ठिकाणावरील कर्मचा-यांना भरपगारी सुट्टी देण्यात येते. किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत दिली जाते. 14 – यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 11 एप्रिल 2019 रोजी होत आहे. त्यामुळे निवडणूक होत असलेल्या मतदारसंघातील खाजगी कंपन्या व त्यामधील आस्थापना, सर्व दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स रिटेलर्स आदी आस्थापनातील कामगारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्याकरीता भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी व इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक आहे.
वर नमुद केल्याप्रमाणे उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने व्यवस्थापकांनी या सुचनांचे योग्य अनुपालन होईल, याची खबरदारी घ्यावी. मतदानाकरीता सुट्टी अथवा योग्य सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता आले नाही, याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनाविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे सरकारी कामगार अधिकारी रा.मो.धुर्वे यांनी कळविले आहे.
०००००००






Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी