14-यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ दोन उमेदवारांचे नामांकन दाखल, वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिनीवरून उमेदवारांना द्यावी लागणार गुन्हेगारी प्रकरणांची माहिती, निवडणूक जाहिरातीत सुरक्षा दलातील व्यक्तिंच्या छायाचित्रांचा वापर नको


यवतमाळ, दि. 20 : 14 -  यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज (दि.20) दोन उमेदवारांचे नामांकन दाखल झाले. अंकित मोहन चांडक आणि समीर अरुण देशपांडे या दोघांनीही अपक्ष म्हणून नामांकन दाखल केले.
००००००
यवतमाळ, दि. 20 :  निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारावर गुन्हेगारी / फौजदार प्रकरणे असतील तर त्याची माहिती उमेदवारांना वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिनीवरून प्रसिध्द करावी लागणार आहे. ही माहिती संबंधित उमेदवाराने अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिनांकापासून ते मतदानाच्या दोन दिवसापूर्वी या कालावधीत तीन वेळा प्रसिध्दीस देणे आवश्यक आहे.
            ज्या उमेदवारांची फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहे किंवा ज्यांना यापूर्वी दोषी ठरविण्यात आले आहे, अशाच उमेदवारांनी ही माहिती द्यावी लागणार आहे. यासाठी येणारा खर्च हा संबंधित उमेदवाराने किंवा पक्षाने करावयाचा आहे. तसेच निवडणुकीच्या खर्चात त्याचा समावेश करणे आवश्यक आहे. वृत्त वाहिनीवर सकाळी 8 ते रात्री 10 या कालावधीत या माहितीचे प्रसारण करावयाचे आहे. याबाबत सर्व उमेदवारांना माहिती तसेच संबंधित नमुनेसध्दा देण्यात येत आहे.
००००००
v भारत निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांसाठी समुपदेशन
      यवतमाळ, दि. 20 :  निवडणूक कालावधीत करण्यात येणा-या जाहिरातींमध्ये उमेदवारांनी / राजकीय पक्षांनी सुरक्षा दलातील व्यक्तिंच्या छायाचित्रांचा वापर करण्यापासून परावृत्त होण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने समुपदेशन जारी केले आहे. याबाबत सर्व राजकीय पक्षांना कळविण्यात यावे, असे निर्देश निवडणूक विभागाला देण्यात आले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी