14- यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाकरीता केंद्रीय निरीक्षक


v शासकीय विश्रामगृह येथे कार्यालय
यवतमाळ, दि. 26 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 करीता 14 – यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक नियुक्त केले आहेत. निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील सुधीरकुमार शर्मा (मो. 9422872010), निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून भारतीय महसूल सेवेतील विक्रम पगारीया (मो. 9057508250), निवडणूक निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून भारतीय पोलिस सेवेतील डी.एच. परमार (मो. 9422862010) आणि निवडणूक निरीक्षक (दिव्यांग मतदार) म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील पियुष सिंह (मो. 7798436337) यांचा समावेश आहे.
सामान्य, खर्च आणि कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षकांचे कार्यालय शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे असून दिव्यांग मतदार निवडणूक निरीक्षकांचे कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे आहे. यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात निवडणूक संदर्भात कुठलीही तक्रार किंवा निवडणूकसंदर्भातील इतर बाबीबाबत कुठलीही माहिती असल्यास उमेदवार किंवा मतदार निवडणूक निरीक्षकांशी प्रत्यक्ष किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधू शकतात.
००००००
 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी