मतदान न केल्यास बँक खात्यातून पैसे वजा होणार असल्याची बातमी चुकीची


v विश्वास न ठेवण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 28 : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान न केल्यास बँक खात्यामधून 350 रुपये वजा होणार असल्याची बातमी पूर्णतः चुकीची आहे. निवडणूक आयोगाकडून 350 रुपये वजा करण्याबाबत कोणत्याही सुचना नाही. त्यामुळे या बातमीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी    14 – यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघ यांनी आहे. सध्या समाज माध्यमांवर ही माहिती व्हायरल झाली असून ती तथ्यहीन आहे.
एखाद्या व्यक्तिने मतदान न केल्यास त्याच्या खात्यातून पैसे वजा करण्याची बँकांना ताकीद देण्यात आल्याची माहितीही चुकीची आहे. तसेच बँक खाते नसलेल्या मतदारांकडून मोबाईल फोनचे रिचार्ज करताना 350 रुपये वसूल केले जाणार असल्याची माहितीसुध्दा तथ्यहीन आहे. नागरिकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. तसेच अशा बातेम्या समाज माध्यमांवर फॉरवर्ड करू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी 14- यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघ यांनी केले आहे. तथापि, मतदान करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य असून मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक नागरीकाने लोकसभा निवडणुकीसाठी अवश्य मतदान करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी