कोरोना प्रादुर्भावाबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला यंत्रणेचा आढावा

 



            यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यंत्रणेचा आढावा घेऊन कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

            पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णांचे हाय रिस्क आणि लो रिस्क संपर्कातील सर्वांचा शोध घेऊन त्यांच्या नमुन्यांची तपासणी करावी, अशा सुचना देऊन जिल्हाधिकारी म्हणाले, रोज किती जणांचे नमुने घेण्यात आले, तपासणीकरीता किती पाठविले आदींची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिका-यांनी देणे बंधनकारक आहे. भांबराजा येथे एकाच गावात मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्यामुळे संपर्कातील नागरिकांचा शोध आणि नमुने तपासणी त्वरीत करावी. जेणेकरून प्रादुर्भावाला आळा घालण्यास मदत होईल. रॅपीड ॲन्टीजन किट प्रत्येक तालुक्याला किती मिळाल्या होत्या. त्यापैकी किती उपयोगात आल्या, शिल्लक किती आदी माहिती रोज अपडेट करावी. तसेच ॲन्टीजन किटबाबत डाटा एन्ट्री किती बाकी आहे, त्याबाबतसुध्दा प्रशासनाला नियमित अवगत करावे.

            वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित गंभीर रुग्ण किती, व्हेंटीलेटरवर किती आहे, याबाबत अधिष्ठाता यांनी रोज माहिती द्यावी. तसेच गृह विलगीकरण व कोव्हीड केअर सेंटरची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी द्यावी. जिल्ह्यातील सर्व कोव्हीड केअर सेंटर आज संध्याकाळपर्यंत सुरू झाले पाहिजे, याबाबत गांभिर्याने लक्ष द्या. या सर्व केंद्रांवर पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक साधनसामुग्री आदींचा पुरवठा करा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

            बैठकीला कोरोना नियंत्रक डॉ. गिरीश जतकर, मेडीसीन विभागाचे प्रमुख डा. बाबा येलके, डॉ. विविक गुजर यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी