जिल्हाधिका-यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

 


Ø इतरांनीही घेण्याचे आवाहन

            यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला दारव्हा येथून सुरवात झाली आहे. सुरवातीला शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना लस देण्यात येत असून याच अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज (दि.24) कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली.

            पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागासह महसूल, पोलिस, नगर पालिका यंत्रणा, पंचायत राज व्यवस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांना लस देण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत एकूण 28324 जणांची नोंदणी झाली असून यापैकी 16133 जणांचे लसीकरण झाले आहे. तर उर्वरीत 12191 जणांचे लसीकरण बाकी आहे. जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी 57 असून सर्वाधिक लसीकरणाची टक्केवारी पोलिस विभागाची आहे. कोव्हीडची लस ही पूर्णपणे सुरक्षित असून नोंदणी झालेल्या सर्वांनी  त्वरीत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी