निवडणूक प्रक्रियेकरीता अधिकारी कर्मचा-यांची माहिती 13 फेब्रुवारीपर्यंत भरण्याचे आवाहन


यवतमाळ, दि. 8 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 करीता जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय / शाळा / महाविद्यालय / सार्वजनिक उपक्रम / बँक / शासकीय कंपनी / स्थानिक स्वराज्य संस्था व इतर शासकीय संस्था तसेच केंद्र शासनाचे कार्यालय / शाळा यांच्या कार्यालय प्रमुखांना कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी – कर्मचा-यांची माहिती विहित नमुन्यात सादर करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचा-यांची माहिती संकेतस्थळावर भरण्याबाबत सुचनापत्र देण्यात आले होते. परंतु ज्या कार्यालयांनी अद्यापपर्यंत माहिती सादर केली नाही किंवा अपूर्ण माहिती सादर केली किंवा एनआयसी संकेतस्थळावर माहिती ऑनलाईन पध्दतीने भरली नाही त्यांनी 13 फेब्रुवारी 2019 पर्यंत माहिती सादर करावी.
            विहित मुदतीत योग्य व प्रमाणित माहिती उपलब्ध न झाल्यास तसेच कार्यालयाकडून दिलेल्या संकेतस्थळावर माहिती अद्यापही भरली नसल्यास संबंधित विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी