मतदार नोंदणीकरीता आणखी एक संधी


v जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुट्टीच्या दिवशी विशेष मोहीम
यवतमाळ, दि. 28 : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 करीता गत पाच महिन्यांपासून जिल्ह्यात मतदार याद्या पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. निवडणूक जाहीर होण्याचा कालावधी लक्षात घेता जिल्ह्यातील मतदारांना नोंदणीकरीता आणखी एक संधी भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने शनिवार आणि रविवार दि.2 व 3 मार्च रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नोंदणीकरीता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या नागरिकांची अद्यापही मतदार म्हणून नोंदणी झाली नाही, अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी व्होटर्स व्हेरिफिकेशन ॲन्ड इन्फोर्रमेशन प्रोग्राम या कार्यक्रमांतर्गत 2 आणि 3 मार्च रोजी नोंदणी करता येईल. याबाबत संबंधितांना सुचना देण्यात आल्या आहेत.
सदर मोहिम जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी आयोजित करण्यात येईल. या कार्यक्रमांतर्गत सर्व मतदान केंद्रावर / मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी नागरिकांकडून नाव नोंदणीकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी उपस्थित राहावे. या मोहिमेदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी केंद्रावर उपस्थित नसल्यास त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार नोंदणीचा हा शेवटचा कार्यक्रम असल्याने सर्व राजकीय पक्ष व त्यांचे गटनिहाय प्रतिनिधी (BLA) यांना याबाबत अवगत करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिल्या आहेत.
तसेच निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी या दोन दिवसांत मतदान केंद्रांना भेटी देऊन सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी