जिल्ह्यातील रेतीघाटांची ई-लिलाव प्रक्रिया आजपासून सुरू


यवतमाळ, दि. 21 : सन 2018-19 या वर्षाकरीता जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील 16 रेती / वाळूघाटांच्या प्रस्तावांना राज्यस्तरीय पर्यावरण आघात निर्धारण प्राधिकरणने 18 फेब्रुवारी 2019 रोजी मंजुरी प्रदान केली आहे.  या अनुषंगाने सन 2018-19 या वर्षाकरीता सदर वाळूघाटांचा लिलाव 30 सप्टेंबर 2019 पर्यंतच्या मुदतीकरीता ई-निविदा, ई-लिलाव पध्दतीने करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
दि. 22 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजतापासून बीडर रजिस्ट्रेशन ऑनलाईन पध्दतीने (संगणकीय नोंदणी) सुरू होईल. दि. 5 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजतानंतर बीडर रजिस्ट्रेशन ऑनलाईन पध्दतीने (संगणकीय नोंदणी) बंद होईल. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजतापासून ई-निविदा ऑनलाईन पध्दतीने (संगणकीय) भरणे सुरू होईल. दि. 7 मार्च रोजी रात्री 8 वाजतानंतर ई-निविदा ऑनलाईन पध्दतीने (संगणकीय) भरणे बंद होईल. 8 मार्च रोजी ई-निविदा डाऊनलोड करून जिल्हाधिकारी  कार्यालय यवतमाळ येथे उघडण्यात येतील आणि त्याच दिवशी लिलाव करण्यात येईल. 8 मार्च 2019 रोजी लॉट क्रमांक 1 रेतीघाट क्रमांक 1 ते 16 वेळ दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत, तसेच दि. 27 फेब्रुवारी 2019 रोजी ई-निविदा व ई-लिलावमध्ये सहभागी होणा-या बोलीधारकांसाठी प्रशिक्षण दुपारी 3 वाजता बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित केले आहे.
रेती लिलावात भाग घेणा-या व्यक्तीस प्रथम नव्याने https://yavatmalco.abcprocure.com या संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. त्याकरीता डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्र अनिवार्य असून ई-मेल, आयडी, पॅन कार्ड, जीएसटी नंबर, शपथपत्र, मागील दोन वर्षांचे आयकर विवरणपत्र, रहिवासी पुरावा अपलोड करून रजिस्ट्रेशन करता येईल. रेतीघाट संबंधात विस्तृत माहिती जसे करारपत्र प्रत, रेतीघाटनिहाय अपसेट प्राईसची यादी, रेती लिलावाच्या अटी व शर्ती https://yavatmalco.abcprocure.com आणि www.yavatmal.nic.in या संकेतस्थळावर तसेच खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ आणि संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे अपर जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी