निवडणूक प्रक्रियेत सर्व यंत्रणांनी गांभिर्याने कामे करावी



निवडणूक प्रक्रियेत सर्व यंत्रणांनी गांभिर्याने कामे करावी
Ø जिल्हाधिका-यांनी घेतली आढावा बैठक
      यवतमाळ, दि. 7 : आगामी लोकसभा निवडणूक प्रक्रियेला प्रशासनाच्यावतीने सुरवात झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणे, हे टीमवर्क आहे. यात सहभागी सर्व यंत्रणांनी निवडणुकीच्या दरम्यान गांभिर्याने कामे करावीत, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी (महसूल) अनुप खांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामालवार, कार्यकारी अभियंता योगेश लाखानी, राष्ट्रीय माहिती व सुचना केंद्राचे राजेश देवते आदी उपस्थित होते.
            निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी असले तरी सर्व यंत्रणांना महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, हे केवळ एकट्याचे काम नाही. निवडणूक प्रक्रियेदरम्यान ठराविक वेळेत ठराविक जबाबदारी संबंधितांनी पार पाडणे गरजेचे आहे. यात कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
            यावेळी निवडणूक प्रक्रियेदरम्यान लागणारे मनुष्य संख्याबळ, ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन पुरवठा, त्या सुस्थितीत असल्याची खात्री, सार्वजनिक व खाजगी वाहनांद्वारे होणारी वाहतूक व्यवस्था, निवडणुकीसाठी लागणारा साहित्य पुरवठा, खर्चाचा ताळेबंद, पोस्टल बॅलेट, कायदा व सुव्यवस्था, प्रसार माध्यम व्यवस्था, बाहेरून येणारे निरीक्षक, कर्मचा-यांचे प्रशिक्षण आदींचा आढावा घेण्यात आला. बैठकीला विविध विभागाचे प्रतिनिधी तसेच नोडल अधिकारी उपस्थित होते. 
0000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी