पोस्टल ग्राऊंडच्या गाळे लिलावास प्रशासनाची मंजूरी


Ø क्रीडा संकूल समितीकडे गाळ्यांचा ताबा
Ø जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक
      यवतमाळ, दि. 8 : शहरातील पोस्टल ग्राऊंड (समता मैदान) येथील गॅलरीच्या खाली असलेल्या गाळ्यांचा आता व्यवसायासाठी लिलाव होणार आहे. अमरावती येथील विभागीय आयुक्तांनी या गाळ्यांच्या ऑनलाईन लिलावासाठी 6 फेब्रुवारी 2019 रोजी प्रशासनाला मंजूरी दिली. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन लिलावासंदर्भात प्रक्रिया त्वरीत करण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे गत पाच वर्षांपासून असलेला प्रश्न निकाली निघाला आहे.  
            गाळ्यांच्या ऑनलाईन लिलावाकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा संकूल समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून मिळणा-या उत्पन्नातून मैदानाची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. येथे असलेल्या गाळ्यांमध्ये क्रीडा साहित्यांची दुकाने, स्टेशनरी, फुड प्लाझा (खावू गल्ली), लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुकानासह इतर दुकाने ठेवण्याचे नियोजन आहे.
            बैठकीला अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी (महसूल) अनुप खांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रवीण कुलकर्णी, नगर रचना विभागाचे सहायक संचालक म.गो. सुर्यवंशी, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनचे सचिव राजू जॉन आदी उपस्थित होते.
            पोस्टल ग्राऊंड येथील गॅलरीखाली असलेल्या गाळ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी एकूण 21 गाळे असून त्याचे क्षेत्रफळ 441.10 चौ. मीटर आहे. सदर बांधकामासाठी 1.75 कोटी रुपये खर्च आला आहे.
००००००

Comments

  1. lilav kevha honar ahe sir,any web portal,please give details

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी