अवैध उत्खनन प्रकरणी बेलोरा रेती घाटावर कारवाई


v दोन पोकलँड मशीन व ट्रक जप्त
यवतमाळ, दि. 7 : वणी उपविभागांतर्गत येणा-या बेलोरा रेती घाटावर रात्रीच्या दरम्यान अवैध रेती उत्खनन करणा-यांविरुध्द कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन पोकलँड मशीन व चार ट्रक जप्त्‍ करण्यात आले.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार श्याम धनमने, बेलोराचे तलाठी व पोलिस कर्मचारी यांच्या ताफ्यासह रात्री 11.30 वाजताच्या दरम्यान अचानक रेती घाटाची तपासणी केली असता येथे अवैध रेती उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी दोन पोकलँड मशीनने (मॉडेल क्रमांक SY 210 C-9 व SY 220 C-9) रेती उत्खनन करण्यात येऊन चार ट्रकमध्ये भरण्यात येत होती. सदर दोन्ही पोकलँड मशीन व चार ट्रक प्रशासनाच्या वतीने जप्त करण्यात आले आहेत.
यावेळी ट्रक क्रमांक एमएच 31- सीबी 9086 (चालक शेख कयम), एमएच 04 - बीजी 810 (चालक रमेश पाटील), एमएच 31 - एपी 7333 (चालक गजानन अंड्रसकर) आणि ट्रक क्रमांक एमएच 40 - बीजी 3883 हे ट्रक रेती घाटावर दोन पोकलँड मशीनद्वारे अवैध रेती उत्खनन करून ट्रकमध्ये भरतांना पकडण्यात आले. एक पोकलँड मशीनचा चालक पळून गेला असून दुसरा चालक धनंजय यादव व ट्रकचालक यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, भारतीय दंड संहिता व पर्यावरण कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मशीन व  वाहने शिरपूर पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद