मतमोजणीकरीता 317 अधिकारी-कर्मचा-यांची नियुक्ती






v प्रशासनातर्फे तयारी पूर्ण
यवतमाळ, दि. 21 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 ची मतमोजणी गुरुवार दि. 23 मे रोजी यवतमाळ येथील दारव्हा रोडवरील शासकीय धान्य गोदामात होणार आहे. या मतमोजणीकरीता एकूण 317 अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आाली असून मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.
14 – यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल 2019 रोजी मतदान घेण्यात आले. या लोकसभा मतदारसंघात 34 – वाशिम, 35 – कारंजा, 77 – राळेगाव, 78 – यवतमाळ, 79 – दिग्रस आणि 81 – पुसद या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. प्रत्यक्ष मतदानापासून जवळपास दीड महिन्याच्या अंतराने म्हणजे येत्या 23 मे मतमोजणी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने 107 मतमोजणी पर्यवेक्षक, 102 सहाय्यक आणि 108 सुक्ष्मनिरीक्षक असे एकूण 317 अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरवात होईल.
शासकीय धान्य गोदामाच्या हॉल क्रमांक 1 मध्ये वाशिम विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी, हॉल क्रमांक 2 मध्ये कारंजा मतदारसंघ, हॉल क्रमांक 3 मध्ये राळेगाव, हॉल क्रमांक 4 मध्ये यवतमाळ, हॉल क्रमांक 5 मध्ये दिग्रस आणि हॉल क्रमांक 6 मध्ये पुसद विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी करण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीकरीता 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक व एक सुक्ष्मनिरीक्षक राहणार आहेत.
टपाली मतपत्रिका व सेनादलातील मतदारांच्या प्राप्त झालेल्या टपाली मतपत्रिकांची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये केली जाणार आहे. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीकरीता तीन टेबल व सेनादलातील टपाली मतपत्रिकांच्या मतमोजणी पूर्व स्कॅनींगकरीता पाच टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हा पोलिस, राज्य सशस्त्र पोलिस दल, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे.
यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 61.08 टक्के मतदारांनी मतदान केले होते.
०००००००




Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी