मतमोजणीच्या दिवशी दारव्हा रोड, शासकीय गोदाम रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद


यवतमाळ, दि. 21 : दिनांक 23 मे 2019 रोजी यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य गोडाऊन, दारव्हा रोड, रेल्वे क्रॉसींग जवळ यवतमाळ येथे होणार आहे. सदर मतमोजणी दरम्यान निवडणूक निकाल जाहिर होणार असल्याने सर्व पक्षाचे कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी दरम्यान यवतमाळ शहरातून बसस्थानक चौक ते दारव्हा रोडने जाणारी व येणारी जडवाहतूक करणारी वाहने चारचाकी वाहने, इतर वाहने तसेच एस.टी. बसेस नेहमीच मुख्य रस्त्यावरून सुरु राहिल्यास वाहतुकीची कोंडी होऊन अघटीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे यवतमाळ शहरातील दारव्हा रोडने येणारी व जाणारी जडवाहतूक करणारी वाहने, एस.टी.बसेस, चारचाकी वाहने तसेच ईतर संपूर्ण वाहनांची वाहतुक ही दारव्हा रोडने नेहमीच्या मुख्य रस्त्यावरून पुर्णत: बंद करून (अत्यावश्यक सेवेची वाहने, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड, पोलीस वाहने वगळून) ती वाहने पांढरकवडा बायपास, धामनगाव बायपास, आर्णी बायपास, घाटंजी बायपास, कळंब बायपास कडून वळविण्यात येतील. सदर वाहने ही दिनांक 23 मे 2019 रोजी सकाळी 6 वाजता पासून ते मतमोजणी प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत पूर्णत: बंद करून सदर वाहतूक उपरोक्त समांतर सोईचे इतर मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी