मतमोजणीच्या दिवशी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू


यवतमाळ, दि. 21 : यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघाची मतमोजणी ही दिनांक 23 मे 2019 रोजी शासकीय धान्य गोदाम, दारव्हा रोड, यवतमाळ येथे होणार आहे. यवतमाळ शहरातील तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहणे आवश्यक असल्याची बाब विचारात घेता फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्वये यवतमाळ जिल्ह्यात मतमोजणीच्या दिवशी (दिनांक 23 मे 2019) रोजी मतमोजणी केंद्रावर (शासकीय धान्य गोदाम, दारव्हा रोड, यवतमाळ) परिसरात जमाव करण्यास, मतमोजणी केंद्रावर मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व ईतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यास तसेच वाहनाचा मतमोजणी परिसरात अनाधिकृत प्रवेश यावर बंदी घालणे आवश्यक असल्याने मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिघाच्या आत भ्रमणध्वनी, तारविरहीत दुरध्वनी आणि बिनतारी संदेश संच इ. बाळगण्यास किंवा वापरण्यास कोणत्याही व्यक्तींना मुभा नाही.
हा आदेश यवतमाळ शहराकरीता दिनांक 23 मे 2019 रोजी सकाळी 6 वा. पासून ते मतमोजणी प्रक्रीया संपेपर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी