अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे अहवाल तात्काळ सादर करा - पालकमंत्री मदन येरावार









v  तिवसा, बोधबोडण, हिवरी, अकोलाबाजार आदी गावातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी
यवतमाळ, दि. 04 : जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबिन, कपाशी, तुर, फळबागा, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे. या शेतकऱ्यांना दिलाशा देण्यासाठी संबंधीत यंत्रणेने तात्काळ सर्व्हे करून अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या तिवसा, बोधबोडण, हिवरी, भांब, रुई, अकोलाबाजार, खैरगाव, मांजर्डा, कामठवाडा, आकपूरी, कारेगाव, वडगाव, चिचघाट आदी ठिकांचा शेतमालाची पाहणी करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जि.प.चे सदस्य रेणूका शिंदे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसिलदार झालटे, यवतमाळचे उपविभागीय कृषी अधिकारी कैलाश वानखेडे आदी उपस्थित होते.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने भरघोष तरतुद केली आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, शासनाच्या या मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. त्यासाठी ग्रामस्तरावरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी तात्काळ सर्व्हे करावा व तसा अहवाल संबंधीत यंत्रणेकडे सादर करावा. नुकसान झालेल्या सर्व पिकांचा संयुक्त सर्व्हे करण्याचा आदेश त्यांनी दिले. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांसाठी शासनाकडून सरसकट मदत देण्यात यावी, अशी मागणी केली.
पालकमंत्री मदन येरावार यांनी भांब येथे बाळकृष्ण ठोकाळे यांच्या शेताची पाहणी केली तसेच इतरही शेतमालाची पाहणी करून शेतकऱ्यांना धिर दिला. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी